Sunday, March 29, 2026
Homeगुन्हातीन लाखांच्या केबल चोरीप्रकरणी साक्रीचे दोन संशयित ताब्यात

तीन लाखांच्या केबल चोरीप्रकरणी साक्रीचे दोन संशयित ताब्यात

तीन लाखांच्या केबल चोरीप्रकरणी साक्रीचे दोन संशयित ताब्यात
चाळीसगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 तालुक्यातील बोढरे शिवारातील JBM सोलर इनेंर्गय सोलर प्लांटमधून सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीची केबल चोरी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी सोलर प्लांटमधील सुमारे ८ हजार मीटर लांबीची पॉलीकेंच कंपनीची काळ्या रंगाची केबल वायर चोरी केली होती. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेची माहिती अशी की, सोलर कंपनीचे सिनियर टेक्निशियन तौसिफ शेख हे प्लांटची पाहणी करत असताना स्काडा सिस्टीममध्ये ब्लॉक क्रमांक ४ व ५ मध्ये करंट कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता तेथील एससीबीचे ६ स्क्वेअर एमएम केबल वायर गायब असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली.
सिनियर एक्झिक्युटिव्ह सोलर प्लांट इंचार्ज सौ्विक मित्र यांनी सहकाऱ्यांसह पाहणी केली असता सुमारे ३ लाख २० हजार रुपयांची केबल चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.दरम्यान तपासादरम्यान पोलिसांना साक्री पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार मच्छिंद्र भटू जाधव (२६) व प्रविण रविंद्र जाधव (२४), दोघेही रा. पेरेजपूर, ता. साक्री, जि. धुळे यांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या