Monday, July 6, 2026
Homeचाळीसगावमार्च महिन्यात अचानक अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यांसह नुकसान !

मार्च महिन्यात अचानक अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यांसह नुकसान !

मार्च महिन्यात अचानक अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यांसह नुकसान !

Oplus_131072

<img class

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मार्च महिन्यात अनपेक्षितपणे चाळीसगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा धक्का दिला. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळ्या ढगांसह विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अनेक भागांना तडाखा दिला.

या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच घरांच्या छपरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी शेतपिकांनाही फटका बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून, वारा वादळ, विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात असून, नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या