Thursday, October 29, 2026
Homeगुन्हासांगवी बुद्रुक गावातून विवाहितेसह तिच्या दोन बालकांचे अपहरण.

सांगवी बुद्रुक गावातून विवाहितेसह तिच्या दोन बालकांचे अपहरण.

सांगवी बुद्रुक गावातून विवाहितेसह तिच्या दोन बालकांचे अपहरण.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि.२९   तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावातून एक २४ वर्षीय विवाहिता व तिचा बारा वर्षीय मुलगा आणि दहा वर्षीय मुलगी असे तिघांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुसलावून त्यांना पळवून नेत त्यांचे अपहरण केले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी तिघांचा शोध घेण्यात आला मात्र तिघे कुठेच मिळून आले नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी बुद्रुक तालुका यावल या गावातील रहिवासी सोनी विकास पांडव वय २४ वर्ष तसेच त्यांचा मुलगा कुणाल विकास पांडव वय १२ वर्ष आणि मुलगी खुशी विकास पांडव वय १० वर्ष या तिघांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेत या तिघांची अपहरण केले आहे.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी त्यांचा शोध घेण्यात आला.मात्र, हे तिघे कुठेच मिळून आले नाही. म्हणून यावल पोलीस ठाण्यात विकास वना पांडव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार उमेश सानप करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या