Friday, May 1, 2026
Homeआंदोलनमधुकर सहकारी साखर कारखाना चौकामध्ये केळी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन..

मधुकर सहकारी साखर कारखाना चौकामध्ये केळी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन..

मधुकर सहकारी साखर कारखाना चौकामध्ये केळी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन..
भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि 1
(न्हावी अमोदा, यावल फैजपूर, फैजपूर यावल कारखाना अमोदा वाहतूक ठप्प. बाळंतपणासाठी जाणाऱ्या गाडीला शेतकऱ्यांनी वाट मोकळी करून दिली.)
(१० ते ४ वाजेपर्यंत सुरु असलेल्या आंदोलनामुळे फैजपूर वरून आलेल्या बसेस परत फैजपूर येथे व यावल येथून आलेली बस परत यावल येथे परत गेल्या.)
जिल्हाधिकारी दुपारी ३ वाजता आंदोनस्थळी दाखल झाले.मालाची मागणी कमी नसून बांधापासून हात कमी करून शेतकऱ्यांनीही एकत्र येऊन मधील व्यापाऱ्याला माल देऊ नये. मेन व्यापाऱ्यालाच माल दया मध्यस्थी व्यापारी लोकांना माल देऊ नका. व्यापारांवर भाव कसा बंधनकारक करता येईल या विषयाची मीटिंगमध्ये चर्चा झाली शेतकऱ्यांनी परस्पर केळी व्यापाऱ्यांना केळी देणार नाही,आम्ही एपीएमसीलाच केळी देऊ शाळांमध्ये मध्यांना मध्ये भोजन देण्यात यावर केळीचा अंतर्भाव करावा अशी मागणी केली होती त्यावर चर्चा झाली.यावल,रावेर,चोपडा,बोदवड vजामनेर या सर्व तालुक्यांमध्ये टोटल किती केळी तयार होणार आहे मार्केटमध्ये केळी किती येणार आहे आणि मागणी किती आहे या सर्व गोष्टी तपासून हा भाव ठरवावा लागेल यासाठी योग्य पद्धतीने भाव निघावा यासाठी केळी किती तयार होणार आहे आणि किती कापणीला येणार आहे हा डेटा मिळणा आवश्यक आहे त्यासाठी चीच आजची बैठक होती यासाठी जिल्हास्तरीय कमिटी स्थापन करण्याची सूचना दिलेली आहे व्यापाऱ्यांची चौकशी करून त्यांचे दप्तर तपासणी करायला सुरुवात केली आहे त्या व्यापाऱ्यांच्या दप्तरामध्ये मध्ये घोळ दिसत असेल तर त्यावर कार्यवाही करून लायसन रद्द केले जाईल आम्ही आमच्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे शंभर टक्के प्रयत्न चालू आहे. असे आंदोलन प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सांगून शेतकऱ्यांची समजूत काढून आंदोलन दुपारी ३. ४५ वाजता समाप्त झाले.
जिल्हाधिकारी येणार नव्हते प्रसंतू (जिल्हाधिकारी प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमाला तीन वेळा हजेरी लावू शकतात तर जगाचा पोशिंदा सकाळ पासून उन्हात बसला आहे तर त्यांना यावेच लागेल असे शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना सांगून आम्ही ते आल्याशिवाय आम्ही उठणार नाही असे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी दुपारी उपस्थित झाले.)

 


. न्हावी तालुका यावल येथील मधुकर सहकारी साखर कारखाना चौकामध्ये दोन ते तीन हजार शेतकऱ्यांचे रस्त्यावर केळी फेकून आंदोलन करण्यात आले.
परिसरामध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते हा परिसर केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो परिसरात मुख्य नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात केळी घेतली जाते. परंतु गेल्या काही दिवसापासून अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या केळी पिकाला फलकावरील भावानुसार दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गारपीट, वादळ, करपा, सीएमव्ही, या सहित आदी रोगांचा केळीवर होणारा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून केळी लागवडी पासून तर कापणी पर्यंत व मशागतीसाठी अनेक खर्चासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो
, पिकांवर अनेक रोगांचे सावट, नापिकी, केळीला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना सततचा होणारा कमी भावाला कंटाळून न्हावी कारखाना चौकामध्ये शेतकऱ्यांनी शेतातील केळी ट्रॅक्टर मध्ये भरून आणून रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांना बोर्डानुसार भाव मिळालाच पाहिजे, जय जवान जय किसान अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन सरकारला जागवण्याचे काम शेतकऱ्यांनी केले.

 


रावेर बोर्डानुसार भाव मिळाला ही मागणी जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत पोहचवण्साठी यावल तहसीलदार यांच्या समोर शेतकऱ्यांनी मागणी मांडली व उद्यापासून रावेर बोर्डाप्रमाणे केळी ची कापणी झाली पाहिजे,अशो माहिती शेतकरी शरद महाजन,चंद्रकांत चोपडे यासह सर्व शेतकऱ्यांनी मांडली. न्हावी गावातून आज ४०गाड्या असून व्यापारी वर मागणी नाही म्हणून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. फलक भावापेक्षा केळीची कमी दराने खरेदी करून व्यापारी शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टास करत आहे . जिल्हा प्रशासन, तसेच बाजार समितीने व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना खालील मागण्यांचे निवेदन दिले
१)शेतकऱ्याला बोर्डानुसार भाव मिळावा २)बराणपुर बोर्ड बंद करावा
३)रावेर बोर्डानुसार भाव मिळावा
४)व्यापारी मालाप्रमाणे भाव घेणे
५)पीलभागाचे वेगळा भाव काढण्यात यावा
६) पिलबागाच्या भावाबाबत कृषी उत्पन्न समिती लक्ष द्यावे
७)आज भाव १४००आहे रावेर भाव १५५०आहे तरी पण व्यापारी ५००रुपये भावात घेत आहे.हा फरक बंद करावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या