न्हावी येथे लग्नास नकार दिल्याच्या रागातून एकावर चाकु हल्ला, फैजपुर पोलिसात गुन्हा दाखल.
यावल : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी या गावात हॉटेल एकांत गौरव समोर लग्नास नाकार दिल्याच्या कारणावरून वाद होत एका ४५ वर्षीय इसमाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच धारदार चाकूने पोटावर वार करून जबर दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्हावी ता. यावल या गावात हॉटेल एकांत गौरव आहे येथे लग्नास नाकार दिल्याच्या कारणावरून वाद होत समशेर उर्फ संजय सरदार तडवी वय ४५ यांना आणि इस्माईल तडवी व जुम्मा हैदर तडवी तसेच त्यांच्यासोबत इतर त्यांचे दोन मित्र अशा चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच धारदार चाकूने वार करून त्यांना जबर दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक संदीप पाटील, पोलिस हवालदार सुपडा पाटील करीत आहे.-पुर्ण-


