यावल येथील एकात्मिक आदिवासी विभागाअंतर्गत क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्तान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ समारोप सोहळ्याची सांगता

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी १८ नोव्हेंबर २०२६आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ११ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’ च्या समारोप सोहळ्यास आज यावल येथे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या उपस्थित संपन्न झाले .
यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात आयोजित ११ नॉव्हेंबर ते १८नॉव्हेंबर या दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी शासन पातळीवर राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि अस्मिता अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमादरम्यान लाभार्थी बंधू-भगिनींशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांची आणि अपेक्षांची माहिती घेतली. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात आणि प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या जीवनात विकासाची नवी संधी निर्माण व्हावी, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, स्वाभिमान आणि समाजहिताच्या विचारांतून प्रेरणा घेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी केला.
या प्रसंगी रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करीत त्यांना विनम्र अभिवादन केले . या समारोपाच्या कार्यक्रमास फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी बबन काकडे,तहसीलदार मोहनमाला नाझिरकर,आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी,माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, सरपंच मिना तडवी,भाजपाचे यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिकारी जहाँगीर तडवी यांच्यासह मोठया संख्येत आदिवासी समाज उपस्थित होते . संपुर्ण सप्ताह यशस्वीरित्या जिल्ह्यात विविध आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालया सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाचे परिश्नम घेतले.

