रेवा कुटी येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात; ४४१ हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 2
ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित रेवा कुटी, वरणगाव येथे वासुदेव परिवाराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ वाजता गणेश आराधना व प्रभू श्रीराम स्तुतीने झाली. त्यानंतर हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओवीचे पठण करत हवन करण्यात आले. यावेळी प्रत्येकी ११ अशा गटांद्वारे एकूण ४४१ सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पाठ सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येक ओवीसोबत हवन करत एकूण १६,८८० आहुती देण्यात आल्या.
या धार्मिक सोहळ्यात तुकाराम पाटील, वैशाली पाटील, पेचिमुत्थु नाडर, सिल्वराणी नाडार, डॉ. रवींद्र माळी, विवेक पाटील, सुलोचना पाटील, डॉ. रेणुका पाटील, दीपक फेगडे, मनोज गोसावी, उमेश माळी, कमलेश येवले, कुणाल शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत बढे, बाळकृष्ण चव्हाण, दिनकर पाटील, प्रकाश पाटील, सुचिता येवले, सुनंदा येवले, प्रतीक बोरणारे, श्लोक बोरणारे, आशिष येवले, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, गौरी येवले, सतीश जंगले, राहुल माळी, सुनीता चौधरी, चेतन झोपे, आकाश भंगाळे, सारंग जोशी, अनिकेत चव्हाण आदी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणून प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ‘राम सेतू’ दगड दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या दगडाबाबत भाविकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. या तीर्थाचे प्राशन करत भक्तांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुरू केलेल्या संगीतमय हनुमान चालीसा पठणाला वर्षपूर्ती झाल्याचे सांगत, भाविकांचा वाढता उत्साह हा संजीवनीसारखा असल्याची भावना राहुल माळी यांनी व्यक्त केली. आगामी काळात आणखी व्यापक नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचा समारोप प्रसाद भोजनाने झाला. शेवटी आभार प्रदर्शन दीपक फेगडे यांनी मानले.


