येथे श्रीहनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर विराट हिंदू संमेलनाचा शुभारंभ.

धर्मध्वज स्थापना,भारत माता व गदापूजन संपन्न.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२ येथील भुसावल रोडवरील श्री
बालाजी मंदीरात श्री हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर भारत माता प्रतिमा पूजन व गदा पूजन करून धर्मध्वजाची स्थापना महर्षी व्यासनगरी विराट हिंदू संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.
विराट हिंदू संमेलनाचा शुभारंभ हा सकल हिंदू समाजात एकता,जात,
भाषा व पंथ यांचा भेदभाव विसरून सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम व हिंदू समाजातील सर्व संत-महंत यांच्या आशीर्वादाने,प्रेरणेने हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गौतमजी खट्टर,संस्थापक सनातन महासंघ विराट हिंदू संमेलनाचे मुख्य कार्यक्रम यावल येथे दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीबालाजी मंदीरासमोरील मैदानावर पार पडणार आहे. संमेलनात संपूर्ण हिंदू समाजाने सहभागी व्हावे,असे आवाहन विराट हिंदू संमेलन निर्वाहन समिती कडून करण्यात आले असल्याचे आयोजक सकल हिंदू समाज तर्फे करण्यात आले आहे.

