Thursday, April 2, 2026
Homeजळगावबियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारोह संपन्न.

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारोह संपन्न.

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारोह संपन्न.

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          दि 2
येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर आर खंडारे,बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी,कार्यकारी संचालिका स्मिता बियाणी,प्रवीण भराडीया उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गुणवंत प्राप्त अशा पाचशे विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस व सर्टीफिकेट वितरण करण्यातआले.
याप्रसंगी बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक रवींद्र तायडे व निवृत्ती पाटील यांनी केले तर प्राचार्य डी एम पाटील यांनी आभार मानले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

– बियाणी मिलिटरी स्कूलचा वार्षिक पुरस्कार वितरण समारोह प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना मनोज बियाणी,सोबत डावीकडून डी एम पाटील,स्मिता बियाणी,डॉ.संगीता बियाणी, आर आर खंडारे,प्रवीण भराडीया आदी.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या