Thursday, April 2, 2026
Homeजळगावदिपनगर प्रकल्पातील अधिकारी मोराडे यांची तडकाफडकी बदली   

दिपनगर प्रकल्पातील अधिकारी मोराडे यांची तडकाफडकी बदली   

दिपनगर प्रकल्पातील अधिकारी मोराडे यांची तडकाफडकी बदली                                        भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 दि 2
दीपनगर प्रकल्पातील मुख्य अभियंता राजेश मोराळे हे अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच रूजू झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई मुख्यालयातून विराज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मोराळे यांच्याकडे कोराडी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अभियंता पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान, पंकज सपाटे यांच्याकडून कार्यकारी संचालक एक हा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे आता केवळ कार्यकारी संचालक (इंधन) हा एकमेव पदभार आहे.
दहा महिन्यातच मोराळे यांची बदली
मुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी 31 मे 2025 रोजी भुसावळ (दीपनगर केंद्र) मुख्य अभियंता म्हणून पदभार घेतला होता व यानंतर प्रशासकीय कारणास्तव कोराडी, खापरखेडा, भुसावळ आणि मुख्यालयात फेरबदल झाले. त्यात मोराळे यांची भुसावळ येथून कोराडी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये बदली करण्यात आली कोणत्या तरी चौकशीतून ही बदली झाल्याची चर्चा आहे . तर भुसावळातील त्यांच्या रिक्त जागेवर मुंबई मुख्यालयातील विराज चौधरी यांची मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या