Friday, May 1, 2026
Homeजळगावगंभीर,पीडित रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी रक्तदान. रक्तदाता मुकुंद गोसावी.

गंभीर,पीडित रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी रक्तदान. रक्तदाता मुकुंद गोसावी.

गंभीर,पीडित रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी रक्तदान.
रक्तदाता मुकुंद गोसावी.

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 दि.३
आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता,सामाजिक बांधिलकीतून रक्तदानाच्या कार्यात निरपेक्ष भावनेने सेवारत व्यक्तिमत्व मुकुंद गोसावी यांनी श्री.हनुमान जयंती व आपल्या आई वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ नुकतेच स्वयंस्फूर्त रक्तदान करून गरीब पीडित रुग्णांना तप्त उन्हाळ्यात रक्तपुरवठा सुरळीत राहण्यासाठी स्वयंस्फूर्त रक्तदान आवश्यक असल्याने रक्तदान करून मुकुंद गोसावी यांनी नागरिकांना आणि रक्तदात्यांना रक्तदान करण्याबाबतचे आवाहन केले आहे

रक्तदान केल्याने कुठलाही त्रास,परिणाम वा कमजोरी येत नाही तर मनाला आनंद,स्फूर्ती मिळते तसेच कुठल्याही विशेष आहाराची गरज नाही,आपण रोज जे साद भाजी.पोळी,भाकरी खातो तेही पुरेस आहे.मी नियमित रक्तदान करतो मला कुठलाही त्रास नाही.आज पीडित गंभीर रुग्ण,थॅलेसीमीया,हिमोफिलिया , सिकलसेल आजाराने त्रस्त असलेले लेकरं,रक्तक्षय असलेल्या व गर्भवती महिला,प्रसूती करिता येणाऱ्या माता यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची सदैव आवश्यकता असते सध्या तप्त उन्हाळा आणि बदलते वातावरण यामुळे सर्व रक्त केंद्रांमध्ये सुरळीत रक्तपुरवठ्याकरिता अडचण निर्माण होत असते,स्वयंस्फूर्त मानवी रक्तदानाच्या पावन कार्यानेच मौल्यवान मानवी जीवनाला नवं जीवन मिळणार असल्याने रक्तदानाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.कुठलाही ऋतू असो किंवा बदलते वातावरण मनाने सशक्त असलेला कुणीही १८ वर्षांवरील ५० किलो वजन असणारे सहज रक्तदान करू शकतात.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या