Sunday, April 5, 2026
Homeगुन्हाअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकाला अटक!

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकाला अटक!

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकाला अटक!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतीनीधी – रावेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, २८ मार्च रोजी रावेर तालुक्यातील एका गावातील सुमारे १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद रावेर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला तपासासाठी निर्देश दिले.तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, मात्र त्यातून ठोस माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.आरोपीने आपले ठिकाण बदलून पळ काढल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी मध्य प्रदेशातील भिकन गाव येथे सापळा रचून शुभम अनिल पाटील याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मुलीला एका खोलीत ठेवले असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलीची सुटका केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या