Sunday, April 5, 2026
Homeजळगावहनुमान प्रागट्य निमित्त समूह पूजा व बजरंग बाण कथा – वडतालधाम, पॅलेटाईन...

हनुमान प्रागट्य निमित्त समूह पूजा व बजरंग बाण कथा – वडतालधाम, पॅलेटाईन (शिकागो) येथे उत्साहात संपन्न

हनुमान प्रागट्य निमित्त समूह पूजा व बजरंग बाण कथा – वडतालधाम, पॅलेटाईन (शिकागो) येथे उत्साहात संपन्न
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी अमेरिकेतील पॅलेटाईन (शिकागो) येथे असलेल्या श्री स्वामिनारायण मंदिर वडतालधाम येथे चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री हनुमानजींचा प्रागट्य उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी या पावन प्रसंगी सकाळपासूनच गुजराती, मराठी, तामिळ, कर्नाटक तसेच उत्तर भारतीय भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि दर्शन घेतले. तसेच हनुमानजींना तेल व नारळ अर्पण करून भक्तीभाव व्यक्त केला.

 


सायंकाळी भव्य समूह हनुमान प्रागट्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांनी विधिवत समूह हनुमान पूजा संपन्न केली. या पूजेमध्ये ५० हून अधिक भक्तांनी एकत्र सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घेतला. वडतालधाम परिवारातील भक्तांनी या पूजेद्वारे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी व शास्त्री मुक्तप्रकाशदासजी तसेच संपूर्ण सत्संग समाजाचे मोलाचे योगदान राहिले. कमलेशभाई शाह, कनुदादा, उमेशभाई, अश्विनभाई, घनश्यामभाई, रिंकुभाई यांनी मुख्य यजमान म्हणून सेवा दिली.

 


यजमानांनी माहिती दिली की, शनिवार आणि रविवारी या निमित्ताने पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांच्या श्रीमुखातून बजरंग बाणाची दिव्य कथा आयोजित करण्यात आली होती. तसेच संगीतबद्ध सुंदरकांडाचेही आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सुभाषभाई (लहान व मोठे), स्नेहलभाई, धरमभाई, शरदभाई, शिरीषभाई, भरतभाई, प्रदीपभाई, धीरुबापा, चेतनभाई, समीरभाई, सुरेंद्रभाई, किरीटदादा, दीपकभाई, नटुदादा, केयुरभाई इत्यादि वरिष्ठ भक्तांसह अनेक भक्तांची उपस्थिती लाभली असे शास्त्री धर्मप्रकाश दासजी यांनी खानदेश लाईव्हशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या