Sunday, April 5, 2026
Homeगुन्हाहुंड्यासाठी छळ; विवाहितेची पोलिसांत तक्रार

हुंड्यासाठी छळ; विवाहितेची पोलिसांत तक्रार

हुंड्यासाठी छळ; विवाहितेची पोलिसांत तक्रार

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ येथील 19 वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार बुशरा नाज मुजम्मील बागवान (रा. एम. आय. कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 24 ऑक्टोबर 2025 रोजी मुजम्मील रफिक बागवान (रा. उमर कॉलनी, भुसावळ) यांच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नावेळी तिच्या आई-वडिलांनी सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च करून सोन्या-चांदीचे दागिने व संसारोपयोगी साहित्य दिले होते.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर सुरुवातीला काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर पती, सासू-सासरे व नणंद यांनी “हुंडा कमी दिला” असा आरोप करत वारंवार टोमणे मारण्यास सुरुवात केली. तसेच घराच्या दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये व नवीन व्यवसायासाठी 2 लाख रुपये माहेरून आणण्याचा तगादा लावला जात होता.तिने माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितल्यानंतर संबंधितांकडून छळ वाढल्याचा आरोप आहे. पतीकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
दि. 24 मार्च 2026 रोजी वडिलांना सासरी बोलावून चर्चा केली असता, पैशांची मागणी पुन्हा करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तक्रारदार व तिच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. तसेच अंगावरील दागिने काढून तिला घराबाहेर काढण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या