Sunday, May 3, 2026
Homeचाळीसगावशेतकरी संघाचा गलथान कारभार उघड; उन्हातान्हात उभा राहिलेल्या शेतकऱ्यांची प्रशासनाकडून दखल नाही

शेतकरी संघाचा गलथान कारभार उघड; उन्हातान्हात उभा राहिलेल्या शेतकऱ्यांची प्रशासनाकडून दखल नाही

शेतकरी संघाचा गलथान कारभार उघड; उन्हातान्हात उभा राहिलेल्या शेतकऱ्यांची प्रशासनाकडून दखल नाही !

भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देऊन पीक पिकवणाऱ्या बळीराजाला आता सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसत आहे. भडगाव येथील शेतकरी संघात ज्वारी खरेदीसाठी टोकन वाटप प्रक्रिया सुरू झाली, मात्र याचे नियोजन इतके निकृष्ट होते की शेतकऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर रात्र काढावी लागली.

प्रशासनाचे दुर्लक्ष:
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत शेतकरी भर उन्हात उभे होते. मात्र, शेतकरी संघाच्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने या रांगांचे नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. तासनतास रांगेत उभे राहूनही टोकन मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण होते.

शेतकऱ्यांचा रोष:
“आम्ही पीक पिकवायचे की अशा रांगा लावायच्या?” असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. डिजिटल पोर्टल आणि ऑनलाईन प्रणालीच्या युगात अजूनही टोकनसाठी २४-२४ तास रांगेत उभे राहावे लागत असेल, तर या यंत्रणेचा काय उपयोग? अशा शब्दांत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या