सरदार वल्लभभाई पटेल शाळेची आणि ठेकेदाराची वॉल कंपाऊंडची बेकायदा शाळा झाली उघड.

प्रशासकीय मंजुरी आणि कार्यारंभ आदेश नसताना काम सुरू.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क -सरकार वल्लभभाई पटेल शाळा आणि बांधकाम ठेकेदारांने कोणती ही प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश नसताना नगरपालिका मालकीच्या खुल्या जागेवर वॉलकंपाऊंड बांधकामाची बेकायदा शाळा नगरपालिकेच्या निदर्शनात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने यावल नगरपालिकेने याबाबत कार्यवाही सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली.
यावल नगरपरिषद कार्यालयातून अधिकृतरित्या मिळालेली माहिती अशी की नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील गट नंबर ७५६ मधील खुल्या जागेवर वॉल कंपाऊंडची अद्याप प्रशासकीय मान्यता नगरपरिषदेला आणि कार्यारंभ आदेश ठेकेदाराला मिळालेला नाही.असे असताना शाळेच्या संस्थापकाने आपल्या सोयीनुसार आणि खुल्या जागेपैकी दहा टक्के जागा वापरायला अशी मारवाडी चाल / पद्धत वापरून एका ठेकेदाराशी संगनमत करून सदरील जागेवर वॉल कंपाऊंडचे काम सुरू केले. वॉल कंपाऊंड चे काम सुरू करण्याच्या आधी यावल नगरपरिषदेने संस्था चालकास लेखी कळविले असताना संस्था चालकाने आणि ठेकेदाराने कोणत्या नियमानुसार आणि कोणाच्या प्रभावाखाली, आदेशान्वये काम सुरू केले,काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले कसे.? कामाच्या ठिकाणी बिना परवाना गौण खनिज कोणाच्या प्रभावाखाली वापरले जात आहे.? अवैध वाळू साठा जागेवर असताना यावल शहर तलाठी काय बघतो? यावल शहर तलाठी मुख्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने यावल नगरपरिषद याबाबत पुढील योग्य कार्यवाही करणार असल्याची अधिकृत रित्या माहिती मिळाली आहे.

