Monday, July 6, 2026
Homeचाळीसगाववाळू वाहतुकीवरून राष्ट्रवादीकडून प्रशासनावर सवाल; ठोस भूमिकेची मागणी

वाळू वाहतुकीवरून राष्ट्रवादीकडून प्रशासनावर सवाल; ठोस भूमिकेची मागणी

वाळू वाहतुकीवरून राष्ट्रवादीकडून प्रशासनावर सवाल; ठोस भूमिकेची मागणी
चाळीसगाव –खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            गिरणा नदीपात्रातील वाळू उत्खनन व वाहतुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठराविक लोकांना फायदा व्हावा म्हणूनच वाळू ठेका बंद करण्यात आला काय, असा थेट सवाल तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
वाळू उत्खननासाठी झालेल्या टेंडर प्रक्रियेला सर्वपक्षीयांनी समर्थन दिले होते. मात्र कंत्राटदारांकडून अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत ठेका बंद करण्यात आला. जर त्या अनियमिततेत तथ्य होते, तर त्यावेळीच वाळू नियंत्रणासाठी पथके का तैनात करण्यात आली नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सध्या वाळू नियंत्रणासाठी चार ते पाच पथके कार्यरत आहेत. मात्र चौकशीला एक वर्ष उलटल्यानंतरही गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन पूर्णपणे बंद झाले आहे का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. या कालावधीत काही मोजक्या लोकांसाठी वाळू वाहतूक सुरू ठेवण्यात आली का, असा आरोपही त्यांनी केला.
ठराविक लोकांना व्यवसाय करता यावा, यासाठीच ठेका बंद करण्याचे धोरण राबवले जात असल्यास ते निषेधार्ह असल्याचे सांगत प्रशासनाने याबाबत स्पष्ट आणि ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

Oplus_131072

<img class

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या