जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.


यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.११
आज दि.११ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपाली धांडे मॅडम होत्या.तसेच सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.रंजना महाजन मॅडम व पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरूड मॅडम उपस्थित होत्या.या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानंतर शाळेच्या शिक्षिका कुंदा नारखेडे मॅडम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा चौधरी मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन पूनम कोळंबे मॅडम यांनी केले.तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनमोल सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

