Monday, April 13, 2026
Homeजळगावअन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत रेशन कोटा वाढविण्याची मागणी

अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत रेशन कोटा वाढविण्याची मागणी

अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत रेशन कोटा वाढविण्याची मागणी

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                तालुक्यासाठी रेशनचे धान्य मिळण्यासाठी इष्टांक (धान्य कोटा) वाढवून मिळावा अशी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ भुसावळ तालुका अध्यक्ष संघरत्न सपकाळे यांचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या संदर्भात पाठवून केली आहे .

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कीअन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय योजना लाभार्थी यांचा वाढीव इष्टांक मिळावा.

भुसावळ तालुक्यातील गरीब कष्टकरी शेतमजूर ज्यांना रेशनचे धान्य मिळत नाही अशा कुटुंबांसाठी शासनाने इष्टांक (धान्य कोटा) गरीब लाभार्थ्यांसाठी वाढवून द्यावा जेणेकरून तालुक्यातील गरजू व्यक्तींना धान्य मिळेल व कोणी धान्यापासून वंचित राहणार नाही.

ग्रामीण भागातील गरीब कुटुंब ज्यांचे उत्पन्न हे 50 हजाराच्या खाली आहे अशा कुटुंबांनाही रेशनचे धान्य मिळत नाही ते तहसील कार्यालयामध्ये मागील दोन-तीन वर्षापासून धान्य सुरू होईल या आशेने चकरा मारून संताप व्यक्त करतात.

परंतु तालुक्याला धान्य कोटा (इस्टांक)शासनाकडून मंजूर झालेला नाही. तरी शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन गोरगरीब जनतेसाठी धान्य कोटा मंजूर करावा व तालुक्यातील गोरगरीब जनता व तळागाळातील घटकांना स्वस्त दरात धान्य मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय द्यावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या