Tuesday, April 14, 2026
Homeजळगावभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                दि.१४
दि.१४ एप्रिल २०२६ रोजी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमधील पीडित कुटुंबातील पात्र वारसांना आज शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे व मुख्य कार्यकारी अधिकारी,श्रीमती करिष्मा नायर जिल्हा परिषद जळगाव यांच्या शुभहस्ते हे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच आदिवासी विकास विभागाचे निर्देशानुसार अत्याचारग्रस्त कुटुंबातील वारसांना दिलासा देण्याच्या हेतूने ‘गट-ड’ संवर्गात या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल अंतर्गत खालील आदिवासी उमेदवारांचा समावेश आहे
१. श्री. नारायण रामसिंग ठाकरे: यांची नियुक्ती ‘चौकीदार’ पदी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघझिरा (ता. यावल) येथे करण्यात आली आहे. २)सागर लहु मोरे: यांची नियुक्ती ‘चौकीदार’ पदी आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, चोपडा (जुने) (ता. चोपडा) येथे करण्यात आली आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी अधोरेखित केले की, पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्राधान्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे ही त्यांना खऱ्या अर्थाने दिलेली आदरांजली आहे.या कार्यक्रमास महापौर महापालिका जळगाव श्रीमती दीपमाला काळे,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल,अरुण पवार सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग जळगाव,योगेश पाटील, प्रशांत माहुरे आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या