धानोरा येथील चतुर्विद महोत्सवात डॉक्टर बाबासाहेब यांचा सन्मान


फैजपूर : खानदेश लाईव्ह प्रतिनिधी
दिनांक ९ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान धानोरा येथील श्री निष्कलंक भगवान प्राणप्रतिष्ठा सोहळा चतुर्विद महोत्सवात आज झालेल्या भव्य संत संमेलनात उपस्थित संत महंतांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतभरातून आलेले वेगवेगळ्या पंथाचे धर्मगुरू, जगद्गुरु, महामंडलेश्वर, संत महंतांनी समरसतेचा संदेश दिला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने खऱ्या अर्थाने समरसता अनुभवायला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी जय जयकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर खऱ्या अर्थाने तंतोतंत संत महंत पालन करीत असतात असे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख तथा अध्यक्ष प्रेरणापीठ पिराना येथील जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वरदेवाचार्यजी महाराज, श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी महाराज, महानुभाव पंथाचे प्रमुख मानेकर बाबा शास्त्री, सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज, ह भ प श्री अमृताश्रम स्वामी महाराज, स्वामी भारतानंदजी महाराज, श्री श्याम चैतन्य जी महाराज, महामंडलेश्वर श्री पवनदास जी महाराज, यांचेसह हजारो भक्तगण उपस्थित होते.

