शिवसेनेतर्फे भुसावळ विधानसभा “एसआयआर” करता बीएलए” प्रमुखपदी संतोष माळी यांची नियुक्ती


वरणगाव – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील रहिवासी शिवसेना (शिंदे गट) भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष बळीराम माळी यांची आगामी “एसआयआर” २०२६ करता भुसावळ विधानसभा बीएलए प्रमुखपदी नियुक्ती केल्याचे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्याकडून दि. १५ एप्रिल रोजी पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
भुसावळ विधानसभा “एसआयआर” (विशेष सखोल पुनरिक्षण) २०२६ करता बूथ लेव्हल एजंट (बीएलए) भुसावळ तालुका प्रमुखपदी संतोष बळीराम माळी यांची नियुक्ती शिवसेना पक्षाचे पदाधिकारी प्राधिकृत व्यक्ती म्हणून नियुक्ती (नेमणूक) शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून करण्यात आली आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सचिव संजय मोरे यांनी केली आहे. यापूर्वी संतोष माळी यांनी पक्षाच्या वाढी साठी केलेले कार्य लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे . पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, संपर्कप्रमुख तथा आमदार तुकाराम काते, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जेष्ठ शिवसैनिक विलास मुळे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी यांनी नियुक्तीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

