Tuesday, October 27, 2026
Homeजळगावपोलीस दलात SRPF महिला बटालियनचे दोन स्वतंत्र गट स्थापन करणे बाबत आणि...

पोलीस दलात SRPF महिला बटालियनचे दोन स्वतंत्र गट स्थापन करणे बाबत आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन पोलीस बॉईज तर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर.

पोलीस दलात SRPF महिला बटालियनचे दोन स्वतंत्र गट स्थापन करणे बाबत आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन पोलीस बॉईज तर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      दि.२७
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा तर्फे विविध मागण्यासाठी गृहराज्यमंत्री (शहरे) मा.ना. योगेश दादा रामदास कदम साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनां जिल्हाधिकारी डॉक्टर रोहन घुगे साहेब जळगाव यांच्यामार्फत निवेदन दिले.

राज्य राखीव पोलीस दलात SRPF महिला बटालियनचे दोन स्वतंत्र गट स्थापन करणे बाबत तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत पुणे येथे येणारे हॉस्पिटल व वाढीव हॉस्पिटल मिळणे बाबत
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे आपणास निवेदन देण्यात येत आहे की केंद्र सरकार व इतर राज्य सरकारच्या धरतीवर (CRPF/CISF/BSF/ITBP) या घटकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात भरती होत असून त्यांच्या स्वतंत्र बटालियन देखील आहेत त्याचप्रमाणे पोलीस दलात सुद्धा महिलांची मोठ्या प्रमाणात भरती होत असते परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये SRPF मध्ये महिलांची भरती होत नसून स्वतंत्र बटालियन देखील स्थापन केलेले नाही
राज्य राखीव पोलीस दलाचे SRPF कार्य पाहता गणेश उत्सव दुर्गा उत्सव महापुरुषांच्या जयंती निवडणूक बंदोबस्त व इतर बंदोबस्तामध्ये मदतीसाठी प्रामुख्याने महिला जवानांची गरज भासते त्यामुळे महाराष्ट्रात SRPF मध्ये महिलांची भरती होऊन त्यांचे दोन स्वतंत्र बटालियनचे गट स्थापन केले गेले तर बंदोबस्ताच्या दृष्टीने अधिक सोयीचे होईल व महिलांना देखील एसआरपीएफ मध्ये नोकरीची संधी मिळेल
त्याचप्रमाणे SRPF मधील ज्या अधिकारांचे व कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे व त्यांच्या घरात बारावी पास ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ज्या महिला किंवा मुली आहेत अशा महिलांना किंवा मुलींना त्यांचे घर चालविण्यासाठी नाईलाजाने SRPF मध्ये आपल्या पतीच्या किंवा वडिलांच्या जागेवर अनुकंपामध्ये SRPF जवान म्हणून नोकरी करण्याची संपूर्ण पात्रता असून सुद्धा एस आर पी एफ मध्ये नोकरी करू शकत नाहीत हा त्यांच्यावरील एक प्रकारचा अन्याय आहे आणि या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे राज्य राखीव पोलीस दलात SRPF महिलांची भरती होत नाही व त्यांची बटालियन सुद्धा कार्यरत नाही
आणि म्हणून राज्य राखीव पोलीस दलात SRPF नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांना मुलींना व त्याच कुटुंबातील अनुकंप धारक मुलींना महिलांना पूर्णपणे न्याय मिळवून देण्यासाठी आपण आमच्या निवेदनाची गंभीर्याने दखल घेऊन राज्य राखीव पोलीस दलात महिलांची भरती सुरू करून भरती झालेल्या महिलांसाठी खानदेशात, विदर्भातील अकोला आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यात स्वतंत्र महिला बटालियन स्थापन करावी ही नम्र विनंती
महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत पुणे येथे येणारे हॉस्पिटल व वाढीव हॉस्पिटल मिळावे 1) रुबी हॉल क्लिनिक 2) जहांगीर हॉस्पिटल 3) नोबेल हॉस्पिटल4) दीनानाथ हॉस्पिटल 5) भारती हॉस्पिटल
यांचे सन 2019 पासून चे देयक थकीत असल्याने पोलीस अधिकारी कर्मचारी व कुटुंबाची गैरसोय होत असून आपण याबाबत ची दखल घेऊन लवकरात लवकर या हॉस्पिटलची आरोग्य योजना पूर्वरत करावी तसेच महाराष्ट्रातील AIIMS हॉस्पिटल मध्ये पण सदर आरोग्य योजना सुरू करावी ही नम्र विनंती पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण नागरे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत तावडे व जिल्हा कार्यकारणी यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या