भुसावळ शहरात बुध्दं सरणं गच्छामि…धम्मं सरणं गच्छामि… संघं सरणं…गच्छामिचा आवाज निनांदला.
परीसरात नवचैतन्य उत्साह आणि मंगलमय वातावरण.
धम्मशील बौद्ध विहाराच्या वतीने
वर्षावास समापन निमित्ताने भव्य धम्मरॅली संपन्न.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी (वा) दरवर्षीप्रमाणे यंदाही भुसावळ शहरातील गांधीनगर येथील स्वतेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व धम्मशील महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास समापन निमित्ताने भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
बुध्दं सरणं गच्छामि धम्मं सरणं गच्छामि संघं सरणं गच्छामिच्या सुरात शांतता प्रिय शिस्तबद्ध धम्मरॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत धम्मशील बुद्ध विहारामध्ये तीन महिन्यापासून वर्षावास निमित्ताने पूज्य भन्ते डॉक्टर हर्षबोधी महाथेरो, रविंद्र कांबळे व्हि.टी. शेजवळ यांनी मिलिंद प्रश्न ग्रंथाचे वाचन केले.
या ग्रंथ वाचनाचा बौद्ध उपासक उपासिकांनी व बालकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन पुण्य प्राप्त केले.
सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता भव्य धम्मा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही धम्मरॅली धम्मशील बुद्ध विहारा पासून गुंजाळ कॉलनी खडका रोड गडकरी नगर रिंगरोड मार्गाने मार्गस्थ होत असतांना ठिक ठिकाणी पुज्य भन्ते डॉ. हर्षबोधी महाथेरो पुज्य भन्ते नागसेन पुज्य भन्ते मुदितानंद यांचे पाय धुऊन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपासिकांनी धम्मरॅलीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या व फुलांचा सडा टाकून धम्मरॅलीचे स्वागत केले. धम्मरॅलीमुळे परीसरात नवचैतन्य उत्साह व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. धम्मशील बुद्ध विहारात रॅलीचे समापन झाले. त्यानंतर पुज्य भन्ते डॉ. हर्षबोधी महाथेरो यांनी उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदेसना दिली. दुपारी एक वाजेपासून उपस्थित उपासक उपासिकांनी भोजनाचा लाभ घेतला. सायंकाळी ६.३० वाजता पुज्य भन्ते डॉ .हर्षबोधी महाथेरो यांच्या हस्ते धम्मशील बौद्ध विहाराच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वतेज बहुउद्देशीय विकास संस्थाचे अध्यक्ष रविंद्र कांबळे कोषाध्यक्ष राजेंद्र तायडे व्ही टी शेजवळ आनंद सपकाळे रविंद्र सावदेकर दिक्षा सोनवणे चंदा सोनवणे आशा सावदेकर यांच्यासह धम्मशील महिला मंडळ पदाधिकारी व उपासिकांनी परीश्रम घेतले.

