यावल तालुक्यात यावल फैजपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध धंदे सर्रासपणे सुरू.
अवैध व्यावसायिक पोलिसांच्या संपर्कात असल्याने, कायद्याचा धाक नसल्याने अप्रिय घटना.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२८
यावल तालुक्यात फैजपूर आणि यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे,उघडपणे सुरू आहे, यांच्याकडून दरमहा मासिक हप्ते गोळा करणारे कलेक्शन करणारे कलेक्टर कोण..? हे सर्व जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे.पर्यायी अवैध धंदे करणारे आपल्या आर्थिक बळावर पोलिसांच्या संपर्कात राहत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा पर्यायी कायद्याचा धाक न राहिल्याने तसेच पोलिसांकडून जी नाम मात्र कारवाई करण्यात येते ती कारवाई सर्वसामान्य गरीब अशा संबंधित व्यक्तीवर केली जाते. आणि जे आर्थिक व इतर प्रभाव संपन्न आहेत त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने काही अवैध धंदे करणाऱ्यांसह नागरिकांमध्ये चर्चा आहे.
किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांचे मत काय ? गोपनीय पद्धतीने माहिती घेतली नव्हती का.? गावच्या पोलीस पाटलाने, आणि स्थानिक जबाबदार समाजसेवकांनी स्थानिक परिस्थितीबद्दल पोलिसांना काही माहिती दिली होती किंवा नाही.? किंवा त्या काही उपाधी खोर ग्रामस्थांना पोलिसांचा कायद्याचा धाक अजिबात नव्हता का.? आणि ती घटना घडल्यानंतर किनगाव येथे एका माथे फिरूने एका शेतकऱ्याची केळीची ५०० खोड कापून फेकली यामुळे
अवैध कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे किनगाव ग्रामस्थांसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा आहे.
तालुक्यात शेती शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील शेती साहित्याची सर्रासपणे चोरी, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतातील पाईप लाईनची तोडफोड करणे विहिरीवरील इलेक्ट्रिक केबल व इलेक्ट्रिक सामान चोरून नेणे,

महिला शेतमजूर शेतात कामावर असताना त्या मजूर महिलांना शिवीगाळ करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंवा इतर सोन्या-चांदीच्या वस्तू जबरी काढून पळून जाणारे इत्यादी लुटीच्या घटना घडत आहे.
एसटी बस स्टँड परिसरात किंवा इतर ठिकाणी बस स्टॉप वर महिलांच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिन्यांची, मोबाईलची आणि रोख रकमेची चोरी करणारे का पकडले जात नाही.
तालुक्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर या नॅशनल,राष्ट्रीय महामार्गावरून तालुक्यासह राज्या राज्यातील अनेक चार चाकी वाहने ओव्हरलोड समान, मशिनरी इत्यादी वजनदार माल भरून सुसाट वेगाने वाहतूक करतात यात अवैध लाकडासह, अवैध गौण खनिज तसेच काही वाहनांचे आरआर रिन्यूअल रजिस्ट्रेशन न केलेल्या वाहनातून अवैधपणे विद्यार्थ्यांची, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची,अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू आहे त्याचप्रमाणे तालुक्यात सट्टा,पत्ता,क्लब,पन्नी दारू गावठी बनावटीची देशी दारू अवैध गौण खनिज वाहतूक सर्रासपणे सुरू आहे इत्यादी व्यवसायिकांना पोलिस कारवाईचा धाक दाखवून, कारवाई होऊ नये म्हणून कलेक्शन करणारे कलेक्टर दरमहा २५ ते ५० पेट्यांचा आर्थिक व्यवहार कोणाच्या प्रभावाखाली आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे कलेक्शन केलेली रक्कम कोणाकोणाला वाटप करतात याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
तालुक्यात अवैध कत्तलखान्याकडे अवैध वाहनातून गुरढोरे,गाईंची सर्रास अवैध वाहतूक करणारे कोण कोण आहेत.? आणि त्यांची अवैध वाहतूक बंद का होत नाही.? किंवा त्यांच्याकडून सुद्धा मासिक हप्ते सुरू आहेत का.? आणि तालुक्यात गौण खनिज अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नंबरसह तसेच अवैध धंदे करणाऱ्या चालकांच्या नावासह भ्रमणध्वनी क्रमांक असलेली यादी तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोह चलेली असताना पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महसूल विभाग संयुक्तपणे कारवाई का करीत नाही या सर्वांकडून कलेक्शन करणारे ते कलेक्टर कोण कोण आहेत? कलेक्टर खाजगी क्षेत्रातील आहे की पोलिसांच्या सोबत कामकाज करणारे आहेत.? आणि कलेक्शन करणारे कोणाकोणाला मॅनेज करतात याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा आहे इत्यादी अवैध धंद्यांची माहिती आणि पुरावे अनेकांजवळ आहेत परंतु कारवाई होत नसल्याने,तसेच तक्रार करणाऱ्यांना काही ठराविक पोलीस आणि अधिकारी संबंधित दोन नंबर व्यावसायिकांच्या माध्यमातून टारगेट केले जात असल्याने मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार .. अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे.
पत्ता क्लब ठीक ठिकाणी नद्या नाल्यांमध्ये आणि गोपनीय ठिकाणी सुरू आहे.
न्यायाधीशाची भूमिका सुद्धा निभावली जात आहे.
यावल- फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत काही गंभीर अशा घटना घडलेल्या आहेत. गुन्हे पण दाखल आहेत. परंतु काही संबंधित मध्यस्थी मार्फत वादी प्रतिवादींना विश्वासात घेऊन मोठे आर्थिक व्यवहार करून आरोपी वगळण्याचे,गुन्हे कामात वापरण्यात येणारे मुद्देमाल मध्ये बदल करण्याबाबत सुद्धा न्यायाधीशाची भूमिका निभावून परस्पर प्रकरण मिटविले जातात
अशी सुद्धा चर्चा किनगाव परिसरासह तालुक्यात आहे.
काय तर म्हणे अवैध गौण खनिज बंद आहे…
दुर्गा विसर्जनाच्या दिवशी रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान
एका गरीब डंपर चालकाकडून
७० लाख रुपयाची आर्थिक लूट करणारे , कलेक्शन करणारे कोण कोण होते.?
जे आर्थिक संपन्न आणि प्रभाव संपन्न आहे त्यांची अवैध वाहतुकीची वाहने कोणाच्या प्रभावाने पकडली जात नाही याबाबत तालुक्यासह भुसावळ परिसरात जोरदार चर्चा आहे.

