Sunday, April 19, 2026
Homeजळगावभुसावळमध्ये राजकीय वाद पेटला: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचा पत्रकार...

भुसावळमध्ये राजकीय वाद पेटला: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

भुसावळमध्ये राजकीय वाद पेटला: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरातील राजकारण सध्या तापले असून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते युवराज लोणारी यांनी भंगाळे यांच्या आरोपांचे जोरदार खंडन करत उलट त्यांच्या जात प्रमाणपत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे .
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत नगरसेवक पिंटू कोठारी, परिक्षित बऱ्हाटे, निकी बत्रा, राजू आवटे, राहुल तायडे, बोधराज चौधरी , पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
युवराज लोणारी यांनी दावा केला की, नगराध्यक्षा भंगाळे-गौर या कुरमी ओबीसी प्रवर्गातील असून त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची जात प्रमाणपत्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली. तसेच भंगाळे यांनी केलेला आरोप — की मंत्री संजय सावकारे जात पडताळणी प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत — हा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोणारी यांनी सांगितले की, जात पडताळणी समितीकडे प्रकरण अंतिम टप्प्यात असून लवकरच सत्य समोर येईल. निवडणूक नियमांनुसार सहा महिन्यांत जात पडताळणी पूर्ण करणे आवश्यक असताना भंगाळे यांना त्यांचा दावा सिद्ध करता येणार नाही, कारण कागदपत्रे संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी नगरसेवक निकी बत्रा यांनी गायत्री गौर यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रात खाडाखोड झाल्याचा आरोप करत ते दस्तऐवज पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच नगरपालिकेच्या नोंदींमध्येही नियमबाह्य जातीचा उल्लेख करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या