घरगुती वापरासाठी आणि कमर्शियल गॅस हंडी वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकात, व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी.

२०० ते ३०० रुपये ऑन घेऊन वाहनधारकांना गॅस.पुरवठा विभागाचे दुर्लक्ष.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२३
शहरात भारत गॅस एजन्सी आणि एचपी गॅस एजन्सी अशा २ गॅस एजन्सी आहेत या दोन्ही गॅस एजन्सीच्या अनेक घरगुती ग्राहकांना आणि किरकोळ व्यापारी,हॉटेल,ढाबा व्यवसायिकांना कमर्शियल गॅस हंडी वेळेवर आणि शासकीय दरात मिळत नसल्याने तसेच काही खाजगी वाहनधारकांकडून २०० ते ३०० रुपये ऑन मनी घेऊन गॅस विक्री होत असल्याने दोन्ही स्तरातील गॅस ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असले तरी याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे गॅस ग्राहकांमध्ये बोलले जात आहे.
जे काही ठराविक घरगुती वापराचे गॅस ग्राहक १ गॅस हंडी ३ ते ६ महिने वापरत आले आहेत त्यांच्या नावावर काही गॅस वापरणाऱ्या ग्राहकांकडून / गॅसवर चालवणाऱ्या वाहनधारकांकडून २०० ते ३०० रुपये ऑन मनी घेऊन एक गॅस हंडी विक्री केली जात आहे.ऑन मनीचा व्यवहार ग्राहक करतात की दुसरा कोणी करीत आहे.? याकडे मात्र पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून गॅस एजन्सीकडे गॅस हंडीचा किती संख्येने पुरवठा झाला.? आणि किती आणि कोणत्या ग्राहकांना प्रत्यक्षात गॅस वितरित करण्यात आला.? आणि हॉटेल,ढाबा, कॅन्टीन,मेस,बेकरी,फॅक्टरी,दुकान किंवा व्यवसायिक वापर करणाऱ्यांना कमर्शियल गॅस हंडी वेळेवर दिली जात आहे किंवा नाही.? तसेच सार्वजनिक मोठमोठ्या भंडारा व इतर खाजगी,सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घरगुती वापराचा गॅस येतो कुठून.? याची चौकशी यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कधी केली.? आणि चौकशी अंती काय निष्पन्न झाले आहे.? याबाबत यावल शहरात ठीक- ठिकाणी चर्चा आहे.

