Thursday, April 23, 2026
Homeआंदोलनपोलीस ठाण्यात आ. अमोल पाटील यांचा ठिय्या; अखेर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात आ. अमोल पाटील यांचा ठिय्या; अखेर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात आ. अमोल पाटील यांचा ठिय्या; अखेर गुन्हा दाखल

 

खंडणीप्रकरणी कारवाईची मागणी

 

जळगाव |    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एरंडोल पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडले. तब्बल चार ते पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 

किशोर बाविस्कर असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी एरंडोल शहरातील छोट्या व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी थेट पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले.सुरुवातीला पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आमदारांनी संताप व्यक्त करत पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला. “गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या सुरूच ठेवणार,” अशी भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिकच तापली.

 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बाविस्कर यांनी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करताना सुमारे २० हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप समोर आला होता. ही बाब उघड झाल्यानंतर आमदारांनी आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या वेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदारांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या