Thursday, April 23, 2026
Homeजळगाववसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत जनजागृती

वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत जनजागृती

वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत जनजागृती

 

जळगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमातून “झाडे वाचवा, पर्यावरण जपा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

 

विद्यार्थ्यांनी शाळा परिसर तसेच आजूबाजूच्या भागातील झाडांना पाणी घालून त्यांची देखभाल करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जाणीव निर्माण झाली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

 

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगत झाडांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. “झाडे हेच आपल्या जीवनाचे आधार आहेत, त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या