वसुंधरा दिनानिमित्त पृथ्वीवरील निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प करूया. भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे प्रतिपादन 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. अन्न ,वस्र, निवारा, आरोग्य देणारी पृथ्वी तिच्यावरील असलेले सर्व जीवसृष्टीचे तसेच निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे संरक्षण, होण्याच्या दृष्टीने हा दिवस वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस म्हणून सर्वदूर साजरा केला जातो . आपण पाहत आहोत कि मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात झालेली पर्यावरणाची हानी होत निसर्गनिर्मित साधन संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट होऊन सर्व निसर्गनिर्मित वनस्पतींचे अतोनात नुकसान होत सर्व सजीव सृष्टी संकटात असल्याने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने तसेच पृथ्वीवरील सर्व सजीवास आवश्यक असलेला भूभाग कायम राहण्यासाठी वसुंधरा दिन म्हणजेच पृथ्वी दिन साजरा केला जातो . काही कारणास्तव मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष जुने असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे त्या जागी पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष लागवड होत नाही जंगलांमध्येही सजीव सृष्टीच आवश्यक असलेली झाडे, पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे त्यामुळे जंगली प्राणी शेतामध्ये येत शेतीचे नुकसान करत आहे पर्यावरणाचा समतोल नसल्यामुळे आपणास अनेक संकटांना जसे तापमान वाढ त्यातून बे मोसमी पाऊस तसेच पावसाळ्यात विविध ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडून मोठमोठे पूर गावामधून येत शेती तसेच पाळीव प्राणी आपल्या डोळ्यासमोर वाहून जात आहे तसेच कोरोना सारखे महाभयंकर आजार निर्माण होत आहेत तरी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पृथ्वी देवतेसाठी येत्या पावसाळ्यात घरातील प्रत्येक सदस्याने किमान वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणाऱ्या संगोपनासहित वृक्ष लावण्याचा , पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा तसेच पुन्हा वापर न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्लास्टिक कचऱ्याची समस्या निर्माण होऊन त्यामुळे नद्या नाले मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे तरी सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचा, तसेच वायू प्रदूषणाचा ही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे खाजगी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून याद्वारे वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे तरी शक्यतो जेथे सार्वजनिक वाहन असेल तेथे सार्वजनिक वाहनात प्रवास करण्याचा तसेच विविध ठिकाणी कार्यक्रमांमध्ये कर्कश ध्वनीचा वापर मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे कर्कश आवाजातील ध्वनीचा वापर न करण्याचा आजपासून संकल्प करत पृथ्वीवरील निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प करूया. असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी केले आहे .


