Saturday, April 25, 2026
Homeजळगावचोपडा - यावल मतदार संघात वाळूचा डंपर पकडला परंतु अधिकाऱ्यांवर राजकीय प्रभाव.

चोपडा – यावल मतदार संघात वाळूचा डंपर पकडला परंतु अधिकाऱ्यांवर राजकीय प्रभाव.

चोपडा – यावल मतदार संघात वाळूचा डंपर पकडला परंतु अधिकाऱ्यांवर राजकीय प्रभाव!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी –  बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शुक्रवारच्या रात्री अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार पकडण्यात आला परंतु हा डंपर एका राजकीय तथा लोकप्रतिनिधी च्या समर्थकाचा असल्याने त्या वाळू डंपर वर कारवाई होऊ नये म्हणून रात्रीपासून शासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय प्रभाव पडत असल्याची चर्चा संपूर्ण भुसावळ विभागात सुरू झाली आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने कोणाची आहेत.? आणि अवैध गौण खनिज वाहतुकीची वाहने पकडून नये म्हणून अधिकाऱ्यांवर राजकीय सामाजिक प्रभाव कसा टाकला जातो हे सर्व तालुक्याला ज्ञात असले तरी रात्रीचे अवैध वाळूचे डंपर पकडले आहे त्याच्यावर नेमकी काय कार्यवाही होणार..? किंवा ते वाहन सोडून दिले जाईल का? याबाबत चोपडा यावल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण भुसावळ परिसरात जोरदार चर्चा आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या