Saturday, April 25, 2026
Homeजळगावभंगाळे यांची जात अवैधता आणि नवीन राजकीय समीकरणे

भंगाळे यांची जात अवैधता आणि नवीन राजकीय समीकरणे

भंगाळे यांची जात अवैधता आणि नवीन राजकीय समीकरणे
भुसावळ   संदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        नगर परिषदेच्या लोकनियुक्त्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाण पत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरविले यामुळे राजकीय खळबळ झाली. पण नवीन राजकीय समीकरणे भुसावळ आणि परिसरात उदयास येणार आहेत .
भुसावळ विधानसभा एससी राखीव झाली तेव्हा पासून संजय सावकारे यांचा आमदार ते नामदार असा चढता राजकीय आलेख आहे.सलग चार वेळा मताधिक्याने निवडून येण्याचा कीर्तिमान त्यांनी निर्माण केला. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भुसावळ लोकनियुक्त नगराध्यक्ष जागा एससी महिला राखीव होती. ना.सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या युतीच्या उमेदवार होत्या. त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. लेवा समाजाच्या सून असलेल्या गायत्री भंगाळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडून आलेल्या होत्या.
भुसावळ मध्ये लेवा समाज मोठा आहे. सलग चौथी पंचवार्षिक विधानसभा राखीव असल्याने या समाजाला विधानसभा निवडणूक लढता आली नाही. लोकनियुक्त नगराध्यक्ष एससी महिला राखीव आरक्षण निघाले. लेवा समाजात एससी सुना आहेत. हीच संधी साधत लेवा समाजातील सुनांनी भुसावळ व सावदा येथे निवडणूक लढवून विजय मिळविला. तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाती जंगले यांनी अपक्ष निवडणूक लढवत अल्पावधीत सुमारे १० हजार मते घेतली हे लक्षवेधक राहिले. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांवर भुसावळ आणि सावदा येथील निवडणूक प्रभाव टाकणार यात शंका नाही.
भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जाती प्रमाण पत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले त्यामुळे पुढे अनेक खेळ विधी माध्यमातून होतीलही परंतु लेवा समाजाची सून हा निवडणुकीत जसे चर्चेत होते तसेच लेवा समाजाच्या सुनेचे जात प्रमाण पत्र अवैध , का ? आणि कसे हे सुद्धा चर्चिले जाईल.
भुसावळ नगर परिषदेत गेल्या निवडणुकीतहि काही नगरसेवकांचे जात प्रमाण पत्र अवैध ठरले होते.विद्यमान नगरसेवकां मध्ये काही वर सुद्धा हि टांगती तलवार असू शकते पण लोकनियुक्त नगराध्यक्ष विषय आघाडीवर राहिला.
ज्या प्रमाणे भुसावळ नगर परिषदेत एससी राखीव जागेसाठी ज्या प्रमाणे चुरशीची निवडणूक झाली त्याच प्रमाणे भविष्यात देखील राखीव जागांवर अशा प्रकारे निवडणूक होऊ शकतात. अशा निवडणुका मुळे समाजातील काही घटक कायम जुळतात तर काही कायम दुरावतात हे सुद्धा अर्धसत्य आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या