Tuesday, April 28, 2026
Homeगुन्हाभुसावळ तालुक्यातील अंजनसोंडा येथे दोन गटात दंगल कुऱ्हाड चालल्याची तक्रार .  तर...

भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडा येथे दोन गटात दंगल कुऱ्हाड चालल्याची तक्रार .  तर दुसऱ्या गटातर्फे नोंदविला मारहाणीचा गुन्हा . 

भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडा येथे दोन गटात दंगल कुऱ्हाड चालल्याची तक्रार .  तर दुसऱ्या गटातर्फे नोंदविला मारहाणीचा गुन्हा .

वरणगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   :येथे एकास मोटारसायकल हळू चालव असे सांगितल्याचा राग येऊन कुऱ्हाडीसह काठीने मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली असुन दुसऱ्या गटातर्फे मोटारसायकल अडवून मारहाण केल्याची तक्रार दि .२८ एप्रील रोजी दाखल करण्यात आली .
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंजन सोंडे येथिल दिनकर पंढरीनाथ पाटील ५६ धंदा शेती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या पत्नी सरलाबाई यांचे सोबत दि २७ एप्रील रोजी घराचे अंगणात बसले असतांना तेथुन धनंजय जितेन्द्र कोळी हा वेगाने मोटारसायकल घेऊन आला त्यावेळी गाडी हळू चालव येथे लहान मुले खेळतात असे सांगीतले असता त्याचा राग आला तो घरी निघुन गेल्यावर त्याचे वडील जितेन्द्र कोळी माझे घराजवळ येवून मला शिविगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली नंतर लगेच पाठोपाठ धनंजय हातात कुऱ्हाडे घेवून आला त्याने कुऱ्हाडीचा वार केला असता मी हाताने अडवण्याचा प्रयत्न केला ती माझ्या डाव्या हाताच्या पंजाला लागली आहे . त्यावेळी घराशेजारी राहाणारे भुषण मधुकर चौधरी हे भांडण आवरण्यासाठी आले असता तेथे उभा असलेला विनोद नागो कोळी याने त्याच्या जवील काठीने भागवत पाटील यांच्या डोक्यावर प्रहार करून जखमी केले . अशा प्रकारे धनंजय कोळी , त्याचे वडील जितेन्द्र कोळी आम्हाला मारहाण करत असतांना अचानक कुणीतरी दगड फेकून मारले त्यात माझी पत्नी सरलाबाई पाटील हिच्या पायास तर रूषीकेश संजय पाटील याचे डाव्या डोळ्याला दगड लागून दुखापत झाली आहे . त्यामुळे जितेन्द्र कोळी, धनंजय जितेन्द्र कोळी, व विनोद नागो कोळी यांचे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली .
तर दुसऱ्या गटाकडून धनंजय जितेंद्र कोळी वय वीस वर्ष याने दिलेल्या फिर्यादीवरून तो दिनकर पाटील यांचे घरासमोरून मोटरसायकलवर जात असताना त्याला गाडी चालवता येत नाही असे म्हणून दिनकर पाटील यांनी शिवीगाळ केली व दिनकर पंढरीनाथ पाटील यांनी गच्ची धरून आता साप्ताने नारायण करून शिवीगाळ केली तसेच त्यांचा मुलगा नकुल दिनकर पाटील याने काठी घेऊन डाव्या हाताच्या बोटाला आणि उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण केली त्यानंतर मी घरी गेलो व माझ्या वडिलांनी त्यांना समजावण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा दिनकर पंढरीनाथ पाटील नकुल दिनकर पाटील व भागवत जगन्नाथ पाटील यांनी खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली भांडण सोडवण्यासाठी आई आली असता तिला सुद्धा शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली तसेच भांडण सोडण्यासाठी आलेले भूषण तायडे अमोल कोळी विनोद नागो कोळी यांना मारहाण केल्यामुळे त्यांच्या डोक्याला व पायाला मुक्का मार लागलेला आहे म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी गावात तणाव सदृश्य परिस्थिती झाल्यामुळे व पोलीस स्टेशनला रात्रीचे वेळी महिला व पुरुषांचा जमाव जमल्यामुळे अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात येवून वरणगाव पोलीसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
तर रात्रीच्या सुमारास दंगलीची माहिती मिळाल्यामुळे भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले व त्यांचे पाठोपाठ जळगाव पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांनी वरणगावला तातडीने भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या