Monday, April 27, 2026
Homeजळगावसांगली बुद्रुक या आर्थिक संपन्न गावात अनेक भागात पाणीटंचाई 

सांगली बुद्रुक या आर्थिक संपन्न गावात अनेक भागात पाणीटंचाई 

सांगली बुद्रुक या आर्थिक संपन्न गावात अनेक भागात पाणीटंचाई

 

गट विकास अधिकारी यांच्यासह ग्रामसेवकाचे दुर्लक्ष.

 

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   दि.२७

तालुक्यातील ग्रामीण भागात म्हणजे यावल फैजपूर रोडवर असलेल्या आर्थिक संपन्न सांगवी बुद्रुक गावात आंबेडकरनगर, युनियन बँक,भास्करनगर व इतर काही भागात,परिसरातील ग्रामस्थांना नळ जोडणी द्वारे पाणी मिळत नसल्याने तसेच ग्रामसेवक यांच्याकडे तोंडी लेखी तक्रारी केल्यावर सुद्धा ग्रामसेवक पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून उन्हाळ्यात ग्रामीण भागात ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने आणि जलजीवन मिशन योजना अपूर्ण असल्याने योजनेचा “फियास्को”झाला आहे.तरी ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत आणि मुबलक होण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल तहसीलदार,यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत नियमित करण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता राहुल जयकार तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कामगार नेते गिरीश कोळंबे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या