Monday, April 27, 2026
Homeजळगावगो'मातेच्या उपस्थितीत "गो" सन्मान आव्हान दिले मुख्यमंत्र्यांना यावल तहसीलदार यांच्यामार्फत.

गो’मातेच्या उपस्थितीत “गो” सन्मान आव्हान दिले मुख्यमंत्र्यांना यावल तहसीलदार यांच्यामार्फत.

‘गो’मातेच्या उपस्थितीत “गो” सन्मान आव्हान दिले मुख्यमंत्र्यांना यावल तहसीलदार यांच्यामार्फत.

 

 

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               दि.२७   सेवा,सुरक्षा,सन्मान,ध्येय उद्दिष्ट लोकशाही मार्गाने आक्रमकता डोळ्यासमोर ठेवून तसेच प्रधान संरक्षक वेधलक्षणा गोमाता अध्यक्ष नंदी बाबा ( वृषभ ) यांच्या प्रेरणेने आज गो सन्मान आव्हान अभियान गोमातेच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि यावल तालुक्यातील संत महंत,आमदार, गोसेवक यांच्या प्रमुख उपस्थित यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले.

 

आज सोमवार दि.२७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोमातेच्या प्रत्यक्ष उपस्थितीत तालुक्यातील संत महंत फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज,महामंडळेश्वर पवनकुमारदासजी महाराज, शास्त्री भक्ती प्रियदासजी महाराज सावदा,रामराज्य संघाचे संजय सराफ,राजाभाऊ चौकशी,संत परदेशी,ॲड.गुंजन वाघोदे,भारती पाटील,नगरसेवक सिद्धेश्वर वाघूलदे,सुरज गाजते,पवन सराफ,

राहुल गुजराथी,समाजसेवक चंद्रकांत कोळी,अनंता नेहेते, संदीप भारंबे,तुषार भारंबे,शंतनू महाजन,यावल शहरातील तालुक्यातील ‘गो ‘रक्षक आणि सेवक यांच्यासह समाजसेवक, सामाजिक,राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने व सन्मान आव्हान अभियानात सहभागी होऊन गो सेवा सुरक्षा सन्मान याबाबतचे निवेदन यावल तहसीलदार वाचून दाखवले.

 

‘गौमाता’ राष्ट्रमाता’ घोषित करण्याची मागणी करत निवेदन दिले. नंतर सामुदायिक चर्चा सुरू असताना तालुक्यात सुरू असलेले कत्तलखाने तातडीने बंद

करण्यात यावेत,तसेच फैजपूर आणि यावल येथील प्रमुख ठिकाणचे अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी उपस्थितांनी केली.

 

यावेळी उपस्थितांनी गौमाता ही भारतीय संस्कृती, कृषी

व्यवस्था आणि अध्यात्मिक परंपरेचा केंद्रबिंदू असल्याचे

सांगत तिला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देण्याची मागणी केली. गोवंश

संवर्धन आणि संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोर

धोरण स्वीकारावे,तसेच अवैध कत्तलखान्यांवर बंदी आणावी,

अशी भूमिका मांडण्यात आली. परिसरात सुरू असलेल्या

कत्तलखान्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रश्नावर

प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी आग्रहांनी मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या