Wednesday, April 29, 2026
Homeजळगावभुसावळ येथे नगराध्यक्षांचे वाहन प्रशासनाने ताब्यात घेतले

भुसावळ येथे नगराध्यक्षांचे वाहन प्रशासनाने ताब्यात घेतले

भुसावळ येथे नगराध्यक्षांचे वाहन प्रशासनाने ताब्यात घेतले
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवले. या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करत त्यांचे शासकीय वाहन ताब्यात घेतले. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारींमुळे झालेली चौकशी : जात प्रमाणपत्राबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत समितीने २३ एप्रिलला निकाल दिला. यामुळे नगराध्यक्ष पदावर संकट कोलमडले आहे.
रविवारी रात्री उशिरा मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दल प्रमुख विवेक माकोडे यांच्या पथकाने वाहन जमा केले. सुट्टीचा दिवस आणि रात्रीची वेळ असतानाही अधिकृत पत्र नसताना ही कारवाई झाली.
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे : “ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे.” असे सांगितले .
आता भुसावळच्या राजकारणात काय वळण येईल, याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या