Wednesday, April 29, 2026
Homeजळगावजळगाव पतपेढीत तज्ञ संचालकपदी आर. आर. धनगर यांची निवड

जळगाव पतपेढीत तज्ञ संचालकपदी आर. आर. धनगर यांची निवड

जळगाव पतपेढीत तज्ञ संचालकपदी आर. आर. धनगर यांची निवड

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि 29

जळगाव जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. आर. धनगर यांची तज्ञ संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव येथे कार्यरत असलेल्या या पतपेढीत माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर काम केले जाते. तज्ञ संचालक पदासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड केली जाते. सु.रा . आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या धनगर यांची याच पार्श्वभूमीवर निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल भुसावळ शहरातील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सदस्य एस. एस. अहिरे, भुसावळ तालुकाध्यक्ष जे. पी. सपकाळे, ग. स. सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे सभापती प्रदीप सोनवणे, संचालक विक्रांत चौधरी, समाधान जाधव, जीवन महाजन तसेच विज्ञान अध्यापक मंडळाचे सुनील वानखेडे आणि सातोद हायस्कूलचे पर्यवेक्षक के. आर. सोनवणे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या