Saturday, May 2, 2026
Homeजळगावमहाराष्ट्र दिन निमित्त शहरात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र दिन निमित्त शहरात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र दिन निमित्त शहरात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

नगरपालिका प्रांगणात उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटनेते युवराज लोणारी, नगरसेवक किरण कोलते, निकी बत्रा तसेच नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

तहसील कार्यालयात तहसीलदार निता लबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी नायब तहसीलदार शोभा घुले, प्रिती लुटे, पुजा अवघडे तसेच गृहरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय प्रांत कार्यालय, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशन येथेही महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र राष्ट्रप्रेम व एकात्मतेचा संदेश देणारे कार्यक्रम पार पडले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या