जळगावात निकृष्ठ रस्त्याने घेतला नागरीकाची जीव . नागरिकांच्या रास्ता रोकोने आमदार-प्रशासन घटनास्थळी!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज शहरातील शिवाजीनगर ते कानरदा रस्त्यावर निकृष्ट कामामुळे ४-६ इंची भयानक भेग पडली असून, दुचाकी चाके अडकून अपघात होत आहेत. १ मे २०२६ रोजी झालेल्या अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यू झाला, आजही त्या ठिकाणी सुकलेले रक्त दिसते.
सकाळी ७ वाजता संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. नगरसेवक विजय बांदल यांना बोलावले, पण अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही. सामाजिक कार्यकर्ते व RTI प्रशिक्षक दीपककुमार पी. गुप्ता यांच्या पाठपुराव्याने आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी बोलणी झाली.

सोमवार ४ मे रोजी ठेकेदार बी. एन. अग्रवाल, अभियंते, आमदार व नागरिकांची संयुक्त बैठक ठरली. तात्पुरते डांबर भरणे सुरू झाले. दीपककुमार पी. गुप्ता यांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, रस्त्याचे तांत्रिक ऑडिट व दर्जेदार बांधकामाची मागणी केली.
महत्त्वाचे: नागरिक जागरूक झाल्याने प्रशासन हलले! आमदार भोळे, नगरसेवक बांदल व गुप्ता यांनी एकमेकांचे आभार मानले.

