Wednesday, May 6, 2026
Homeगुन्हाभुसावळ गौसिया नगरात एका रात्रीत तीन रिक्षांच्या बॅटऱ्या चोरी; नागरिकांत भीतीचे वातावरण

भुसावळ गौसिया नगरात एका रात्रीत तीन रिक्षांच्या बॅटऱ्या चोरी; नागरिकांत भीतीचे वातावरण

भुसावळ गौसिया नगरात एका रात्रीत तीन रिक्षांच्या बॅटऱ्या चोरी; नागरिकांत भीतीचे वातावरण

 

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

भुसावळ शहरातील गौसिया नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत तीन मालवाहतूक रिक्षांच्या बॅटऱ्या चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

शेख आबिद शेख खलील पिंजारी (वय ३५, रा. गौसिया नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तसेच मालवाहतूक रिक्षा चालवून व्यवसाय करतात. दिनांक १ मे २०२६ रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे आपली रिक्षा (क्र. एमएच-१९-सीडब्ल्यू-४०६८) घरासमोर उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा सुरू करताना बॅटरी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेनंतर परिसरात चौकशी केली असता, शेख रशीद शेख हमीद (रिक्षा क्र. एमएच-०२-सीई-२९३८) तसेच शेख फरीद शेख रसूल (रिक्षा क्र. एमएच-१९-बीएम-५३६१) यांच्या रिक्षांमधील बॅटऱ्याही त्याच रात्री चोरीला गेल्याचे उघड झाले.

चोरीस गेलेल्या बॅटऱ्यांची एकूण किंमत सुमारे १४ हजार ८०० रुपये असून, त्यामध्ये एस.एफ. सोनी (५,८०० रुपये), ग्लोबल (३,५०० रुपये) आणि एक्साईड (५,५०० रुपये) या कंपन्यांच्या बॅटऱ्यांचा समावेश आहे.

या प्रकरणी संबंधित तिघांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या