Wednesday, May 6, 2026
Homeजळगावगटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी स्वीकारला पदभार.

गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी स्वीकारला पदभार.

गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी स्वीकारला पदभार.

 

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.५   जिल्हा परिषद येथील येथील माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी यावल तालुक्याचा गटशिक्षण अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून यावल तालुक्यातील शिक्षक संघटनांनी त्यांच्याशी शैक्षणिक कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करीत त्यांचा सत्कार केला.

 

प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रोटान शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी साहेबांचा सत्कार करीत त्यांना यावल तालुक्यातील शिक्षण विभागातील समस्यांचे अवलोकन करून दिले याप्रसंगी भुसावळ माध्यमिक पतपेढीचे माजी उपाध्यक्ष पी.एस.सोनवणे हे सुद्धा उपस्थित असून त्यांनी शिक्षक संघटनांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांच्यातील सुसंवादा संदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले प्रोटॉन संघटनेचे उपाध्यक्ष काकडे तालुक्याला एक चांगला अधिकारी लाभला असल्याची भावना व्यक्त केली या प्रसंगी अमानुल्लाह खान पठान यांनी स्वागत केले पठान अरशदखान सर,केंद्र प्रमुख शेख शाकीर सर,ग.स.चे संचालक सैयद शफीक सर,अमजद सर व मुख्तारअली सर सुभाष पाटील सर आनंद जाधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या