Thursday, August 13, 2026
Homeआंदोलननसरापुर , व केज येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी -...

नसरापुर , व केज येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी – शिवसेना

नसरापुर , व केज येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी – शिवसेना

 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील नसरापुर येथील ४ वर्षीय लहान मुलीवर अत्याचार करणारा भिमराव फांबीक यास फाशीची शिक्षा द्यावी यासाठी शिवसेना महिला आघाडी च्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .

 

Oplus_131072

निवेदनात म्हटले आहे की अत्याचार करणाऱ्या दुष्ट व राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमाने मुलीवर अत्याचार करून नंतर द‌गडाने खुन करून शेणाचे ढिगाऱ्याखाली प्रेत लपवून ठेवून माणुसकीला काळीमा फासणारी घटना केली असून सदर ची घटना ही दया करण्यासारखी नाही. तसेच केज तालुका जिल्हा . बिड येथे ३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. सदरील दोन्ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाण्या आहे .

सदर गुन्हयात दोषीना फास्ट ट्रॅक कोर्टात खेचून मरे पर्यंत फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे . काही दिवसांनी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे .

 

Oplus_131072

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख नंदा प्रकाश निकम , सुरेश कोल्हे ,वर्षा तल्लारे , मनिषा पाटील , मिनाक्षी गणकर ,सिंधिया अन्थोनी , जावेद ,पवन भोळे , अनिकेत जैन, हमीद शेख ,गोली तायडे , अंकुश निकम आदी उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या