प्रमाणपत्रावरून राजकारण व प्रशासनात खळबळ
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांच्या अनुसूचित जाती (महिला) आरक्षणातून 2025 च्या निवडणुकीत झालेल्या निवडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत नगरपरिषदेच्या जुन्या रेकॉर्डमध्ये कथित छेडछाड करून त्यांच्या जातनोंदीला ‘संदिग्ध’ करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शहर पोलीस स्टेशनमध्ये गायत्री भंगाळे यांनी तक्रार दाखल दिली आहे .
गायत्री भंगाळे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आजोबा स्व. प्रेमनाथ कामताप्रसाद यांची नगरपरिषद नोंद 1949 मध्ये “प्रेमनाथ कामता प्रसाद चमार” अशी स्पष्ट आहे. त्यांच्या ताब्यात 1950 चा मूळ दस्तऐवज, तसेच 1975‑76 आणि 1981‑84 कालावधीतील प्रमाणित रेकॉर्ड उपलब्ध आहेत, ज्यात सर्व नोंदी एकसमान असल्याचे त्या म्हणतात.जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे देण्याच्या प्रक्रियेदरम्यान जुन्या रेकॉर्डमध्ये बदल करून त्याला शंकास्पद केल्याचा अॅक्युझेशन उभा करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक निकालावर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, राजकीय व सामाजिक वर्तुळात उलाढाल झाली आहे.
मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल आणि नंतरचा टर्निंग पॉईंट
30 मार्च 2026 रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले की, जुने रेकॉर्डमध्ये कोणतीही छेडछाड नाही, तर सर्व नोंदी योग्य आहेत. तरीही, त्याच दिवशी नगरपरिषद कर्मचारी मुरलीधर बाविस्कर यांना सर्व मूळ कागदपत्रे घेऊन जळगाव येथील जात पडताळणी समितीकडे जाण्याचे आदेश दिले गेले