Friday, May 8, 2026
Homeभुसावळभुसावळात मोठी घडामोड : उपनगराध्यक्षांना पदभार सोपवण्याचे आदेश! 

भुसावळात मोठी घडामोड : उपनगराध्यक्षांना पदभार सोपवण्याचे आदेश! 

भुसावळात मोठी घडामोड : उपनगराध्यक्षांना पदभार सोपवण्याचे आदेश! 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ नगरपरिषदेत मोठी प्रशासकीय आणि राजकीय घडामोड समोर आली आहे. माजी नगराध्यक्ष सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांचे जातप्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी अवैध ठरवल्यानंतर राज्य शासनाने त्यांची नगराध्यक्ष म्हणून झालेली निवड रद्द केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, भंगाळे यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आली असून त्या नगराध्यक्ष पदावर राहण्यास अपात्र ठरल्या आहेत, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ च्या कलम ५७(२) नुसार, अध्यक्ष पदावरून अपात्र ठरल्यास संबंधित व्यक्तीने पदाचा कार्यभार उपनगराध्यक्षांकडे सोपवणे बंधनकारक आहे. असे आदेश जिल्हा अधिकारी यांनी दिले होते. मात्र, उपनगराध्यक्ष सौ. शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांनी ५ मे रोजी दिलेल्या अर्जात भंगाळे यांनी अद्याप पदभार न सोपवल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी कलम ५७(४) अंतर्गत आदेश जारी करत भंगाळे यांना तात्काळ नगराध्यक्ष पदाचा कार्यभार तसेच सर्व कागदपत्रे, अभिलेखे व मालमत्ता उपनगराध्यक्ष नारखेडे यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच, आदेशाचे तात्काळ पालन न केल्यास कलम ५७(५) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या प्रकरणामुळे भुसावळच्या राजकारणात खळबळ उडाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या