Thursday, September 10, 2026
Homeजळगावपवन रविंद्र नाले यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड 

पवन रविंद्र नाले यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड 

पवन रविंद्र नाले यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशानुसार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी, तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे पवन रविंद्र नाले यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पवन नाले हे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंवर्धन, जैवविविधता जतन तसेच सामाजिक जनजागृतीच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी विविध स्तरांवर जनजागृती मोहिमा, वृक्षलागवड उपक्रम तसेच युवकांना पर्यावरणाबाबत प्रेरित करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे व कार्यतत्परतेमुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.त्यांच्या निवडीमुळे भुसावळ तालुक्यात पर्यावरण संरक्षण, स्वच्छता अभियान, जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार असल्याचेही सांगण्यात आले.
या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणप्रेमी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पवन नाले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिम, प्लास्टिकमुक्त अभियान तसेच युवकांसाठी पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या