Tuesday, May 12, 2026
Homeजळगावछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर यावल नगरपालिका क्षेत्रात आज पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर यावल नगरपालिका क्षेत्रात आज पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर यावल नगरपालिका क्षेत्रात आज पार पडले.

 

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  दि.१२

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर यावल नगरपालिका क्षेत्रात आज शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळेत आमदार अमोल जावळे यांच्यासह राजकारणातील सत्ताधारी,आणि विरोधी गटाच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत अनेक लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत दाखले आणि प्रमाणपत्र देण्यात आले त्याचबरोबर अनेकांच्या समस्यांचे निराकरण सुद्धा झाले.

 

यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार अमोल जावळे,यावल नगरपरिषद अध्यक्षां सौ.छायाताई अतुल पाटील,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, नगरपरिषद सदस्य यांच्यासह तालुक्यातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

 

सदर शिबिरात महिला,विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना ज्या काही समस्या महसूल विभागात येतात त्या एका दिवसात पूर्ण सोडविल्या जातात आणी विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले ६ दिवसाच्या आत महसूल विभागा कडून दिले जातात

१०० दिवस गतिमान प्रशासन या मुख्यमंत्री देवाभाऊंच्या संकल्पनेतून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून शिवजयंती निमित्त सुरु करण्यात आले.अशी शिबीरे वर्षातून ४ वेळेस घेण्यात येणार असून जनतेला प्रांत कार्यालय,

तहसील कार्यालय आणि पंचायत समिती मध्ये चकरा मारून आपला वेळ वाया घालविण्याची गरज पडणार नाही.यातून गतिमान प्रशासनाचा एक आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घालून दिला आहे

आज या उदघाटन प्रसंगी मा आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण झाले. जनतेची नागरिकांची शेतकऱ्यांची कामे वेळेवर होण्याच्या सूचना आमदार जावळे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

 

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी वेधले लक्ष – यावल नगरपालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजना राबवली गेली आहे यात शेकडो लाभार्थ्यांना आवास योजनेची रक्कम अद्याप मिळालेली नाही या योजनेत लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली, अनेकांचे आवास / घराचे काम पूर्ण झाले तर निधी अभावी अनेक लाभार्थी आजही वंचित आहे तसेच केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याची खंत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केल्याने आमदार जावळे यांनी यावल नगरपरिषदेत पंतप्रधान आवास योजनेचे काम बघणाऱ्या विशाल सोनवणे यांच्याकडून योजनेची माहिती घेत निधी का रखडला गेला.? याची माहिती घेऊन निधी संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर आठ दिवसात काय कार्यवाही केली याबाबतची माहिती देण्याची सूचना केली.

 

कार्यक्रम तब्बल २ तास उशिरा –

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान सकाळी १० वाजता सुरू होणार होते.कार्यक्रमासाठी यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षां सौ.छायाताई पाटील,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह आयोजक अधिकारी कर्मचारी यांच्यासह नागरिक, लाभार्थी,समस्याग्रस्त वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परंतु कार्यक्रम तब्बल २ तास उशिरा सुरू झाल्याने सत्ताधारी गटाकडून विरोधी गटाला वेठीस धरले गेले का.? अशी चर्चा उपस्थितांमध्ये झाली असली तरी तरी आमदार जावळे यांचे सकाळी दोन ठिकाणी महत्त्वाचे कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी त्यांना जास्त वेळ लागल्याने सदरचा कार्यक्रम २ तास सुरू झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या