Tuesday, May 12, 2026
Homeगुन्हातरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण ; कपडे काढून रस्त्यावर पळवले !

तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण ; कपडे काढून रस्त्यावर पळवले !

तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण ; कपडे काढून रस्त्यावर पळवले !

 

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : तालुक्यातील गोरनाळे येथे जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच संबंधित तरुणाचे कपडे काढून त्याला रस्त्यावर पळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर संशयितांनी पीडिताच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरनाळे येथील रहिवासी योगेश भारत इंगळे याचा गावातील काही व्यक्तींशी जुना वाद होता. शुक्रवारी तो शेताकडे जात असताना काही जणांनी त्याला घरासमोर अडवले. त्यानंतर त्याच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. तक्रारीनुसार, संशयितांनी त्याचे कपडे काढून त्याला रस्त्यावर पळवले.

 

मारहाणीतून बचाव करत योगेश इंगळे घरी परतल्यानंतरही संशयितांनी त्याचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. तसेच घराचा दरवाजा तोडून पेट्रोल टाकत घर पेटवण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील योगेश इंगळे याला उपचारासाठी पोलिस वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, रांजणी गावाजवळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

उपचारानंतर रविवारी रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर योगेश इंगळे यांनी फत्तेपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या