Sunday, May 17, 2026
Homeजळगावभरधाव डंपरची धडक; दोन आदिवासी युवकांचा मृत्यू! चालक–मालक कोण? 

भरधाव डंपरची धडक; दोन आदिवासी युवकांचा मृत्यू! चालक–मालक कोण? 

भरधाव डंपरची धडक; दोन आदिवासी युवकांचा मृत्यू! चालक–मालक कोण?

 

गोरगरिबांना न्याय मिळणार का, की ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ ?

 

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मुक्ताईनगर–बऱ्हाणपूर रोडवरील इंदूर ७५३ रस्त्याच्या कामादरम्यान भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन आदिवासी युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १२ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुक्ताईनगर स्मशानभूमीजवळ घडली. मृतांमध्ये राजकुमार गोपाल बारेला (१८) आणि राहुल गणपत ठाकूर (१६, दोन्हे रा. जुना पिंपरी रोड, मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. शेतीचे काम आटोपून ते एमपी.६८-झेडडी ८१६० क्रमांकाच्या मोटरसायकलने घरी जात असताना चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरने त्यांच्या गाडीला भीषण धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबर होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघेही मुळचे आदिवासी समाजातील असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.

 

दरम्यान, डंपरवर रक्ताचे डाग नाहीत, या कारणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. चालक आणि मालक नेमके कोण, ते सापडतील का, गोरगरिबांना न्याय मिळेल का की ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याची वेळ येईल, असा संतापजनक प्रश्न नागरिकांमध्ये उठू लागला आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करून खरा चालक आणि मालकाला तातडीने ताब्यात घ्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, मृत युवकांच्या कुटुंबीयांनी न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या