Monday, May 18, 2026
Homeगुन्हाभुसावळात जबरदस्ती धर्मांतराचा प्रकाराने खळबळ , आरोपी अटकेत !

भुसावळात जबरदस्ती धर्मांतराचा प्रकाराने खळबळ , आरोपी अटकेत !

भुसावळात जबरदस्ती धर्मांतराचा प्रकाराने खळबळ , आरोपी अटकेत !

बुरखा घालण्यास तरुणीने दिला नकार

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आणि शिक्षणासाठी भुसावळ येथे आजोबांकडे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातून हा गुन्हा भुसावळ येथील घटना असल्याने वर्ग करण्यात आला आहे . पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर संबंधित गुन्हा प्रथम सिवनी मालवा (जि. नर्मदापूरम, मध्यप्रदेश) येथे दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासासाठी हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणी नविल शेख (रा. भुसावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दहावीच्या शिक्षणासाठी भुसावळ येथे आजोबांकडे वास्तव्यास आली होती. शिक्षणादरम्यान तिची ओळख संशयित आरोपीशी झाली आणि त्यातून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. दरम्यान, एका कॅफेमध्ये झालेल्या भेटीदरम्यान आरोपीने तरुणीचे छायाचित्र काढले होते तसेच तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, धर्म वेगळा असल्याचे कारण देत तरुणीने विवाहास नकार दिला होता. तरुणीच्या तक्रारीनुसार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीने पीडितेला फोन करून भेटण्यासाठी बोलावले. भेटीस न आल्यास कुटुंबीयांना ठार मारण्याची तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने वरणगांव रोडवरील सुंदरनगर परिसरातील एका खोलीवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच, 7 मार्च 2026 रोजी आरोपीने दुसऱ्या दिवशी पहाटे तयार राहण्यास सांगितले आणि विवाहासाठी सोबत न आल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने म्हटले आहे. भीतीपोटी ती आरोपीसोबत गेल्यानंतर तिला दीपनगर परिसरातील एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे उपस्थित मौलानांकडून कलमा पठण करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला नकार दिल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने कलमा पठण केल्याचे आणि त्यानंतर मुस्लिम रितीरिवाजानुसार विवाह लावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.यानंतर आरोपीने तिला सुंदरनगर परिसरातील खोलीत आठ दिवस ठेवले. बुरखा परिधान करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती तसेच विरोध केल्यास मारहाण करण्यात येत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. अखेर कुटुंबीय, काही सामाजिक संघटना आणि स्थानिकांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली, त्यानंतर ती मूळ गावी परतली.पीडित तरुणीने 10 मे 2026 रोजी सिवनी मालवा महिला हेल्प डेस्क येथे लेखी तक्रार दिली. त्यानंतर सिवनी मालवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी प्रकरण भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 127(3), 351(3) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नविल शेख याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या