Tuesday, May 19, 2026
Homeगुन्हादारूच्या नशेत गावठी पिस्तुलातून दहशत; नागरिकांनीच दिला चोप !

दारूच्या नशेत गावठी पिस्तुलातून दहशत; नागरिकांनीच दिला चोप !

दारूच्या नशेत गावठी पिस्तुलातून दहशत; नागरिकांनीच दिला चोप !

 

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दि. १७ मे रोजी रात्री वाघ नगर परिसरातील सिद्धीविनायक चौकात दोन मद्यधुंद तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत गावठी पिस्तुल दाखवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

प्रवीण महादू महाले (रा. पिंप्राळा) व खगेश मिलिंद चौधरी (रा. आसोदा, ता. जळगाव) यांनी परिसरात वाद घालत नागरिकांना धमकावल्याचा आरोप आहे. यावेळी संशयितांनी गावठी पिस्तुल रोखून फायरिंग करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी दोघांना पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.घटनास्थळावरून पोलिसांनी गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. पोलिसांना एक जिवंत काडतूस आढळून आले असून प्रत्यक्ष गोळीबार झाला की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

 

याप्रकरणी संशयितांविरुद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्म अॅक्ट व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या